https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ला चौथ्या नॅक मूल्यांकनात ए प्लस ग्रेड

नांदेड:(दि.१४ ऑक्टोबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत यशवंत महाविद्यालयाचे दि.६ व ७ ऑक्टोबर २०२३ रोजी चौथे नॅक मूल्यांकन राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, बेंगलुरुद्वारे नियुक्त त्रिसदस्यीय नॅक समितीतर्फे संपन्न झाले.
यशवंत महाविद्यालयाचे आजपर्यंत तीन वेळेस नॅक मूल्यांकन झाले असून या तीनही नॅक मूल्यांकनात ए दर्जा महाविद्यालयास प्राप्त झालेला आहे.
इ.स.२००४ मध्ये प्रथम नॅक मूल्यांकन झाले असून त्यात महाविद्यालयास ८५ टक्के गुण प्राप्त होऊन ए दर्जा मिळाला. इ.स. २०१० मध्ये द्वितीय नॅक मूल्यांकन झाले असून त्यात महाविद्यालयास ३.३१ सी.जी.पी.ए. प्राप्त होऊन पुन्हा एकवार ए दर्जा प्राप्त झाला. इ.स.२०१५ मध्ये तृतीय नॅक मूल्यांकन झाले असून त्यात महाविद्यालयास ३.२९ सी.जी.पी.ए. प्राप्त होऊन महाविद्यालयाने ए दर्जा कायम ठेवला.
एक जानेवारी २०२३ पासून प्रारंभ झालेल्या नवीन पी.जी. फॉरमॅट व बेंचमार्कनुसार चौथ्या नॅक मूल्यांकनात ३.२७ सी.जी.पी.ए. प्राप्त होऊन प्रथमतःच महाविद्यालयास ए प्लस ग्रेड प्राप्त झाला आहे. पूर्वीच्या नॅक मूल्यांकनापेक्षा या नवीन पुनर्रचित नॅक मूल्यांकनाची काठीण्य पातळी जास्त असताना देखील प्राप्त झालेले हे यश महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवल्यासारखे आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून नॅकची तयारी सांघिक भावनेने युद्ध पातळीवर सातत्याने सुरू होती.
तिसऱ्या नॅक मूल्यांकनाचा मान्यताप्राप्त कालावधी शिल्लक असताना देखील चौथ्या नॅक मूल्यांकनासाठी प्रस्ताव दाखल करणारे ‘यशवंत ‘ हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे.
कोविड काळामध्ये अध्ययन अध्यापनाचा सिस्को वेबेक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रभावी पद्धतीने वापर करणारे महाविद्यालय म्हणून ‘यशवंत ‘ ची गणना केली जाते. कोविड काळातच स्टुडन्ट सपोर्ट उपक्रमांतर्गत सक्रिय व प्रभावी रीतीने ऑनलाइन ‘यशवंत युवक महोत्सव’ घेणारे हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे तसेच महाविद्यालयीन प्रशासनासाठी स्वतः विद्यार्थी व प्राध्यापकांनी संयुक्तरीत्या एकूण तीन सॉफ्टवेअर तयार केल्यामुळे ए प्लस हा ग्रेड महाविद्यालयास प्राप्त होऊ शकला.
या दैदिप्यमान सुयश आणि प्राप्ती बद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका आणि इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल.व्हि.पद्माराणी राव, उपप्राचार्य, समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी आदींचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री श्री.डी.पी.सावंत, सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲड.उदयराव निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य माजी प्राचार्य डॉ.बी.एस.ढेंगळे, श्री.पांडुरंगराव पावडे, कु.श्रीजयाताई चव्हाण, कु. सुजयाताई चव्हाण, श्री.नरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704